आपला जिल्हा

सेलू शहरात वादळाचा तडाखा – भारतीय जनता पक्षाचं तात्काळ मदत कार्य

मेघनादीदींच्या कार्यशैलीचा प्रभाव स्पष्ट

सेलू ( प्रतिनिधी ) आज सेलू शहरात आलेल्या अचानक वादळ व पावसामुळे अनेक भागांत झाडे कोसळली, पत्रे उडाली आणि जनजीवन विस्कळीत झालं. संकटाच्या या क्षणी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष अशोक शेलार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.

 

 

शहरातील विविध ठिकाणी पडलेली झाडं हटवणं, उडालेल्या पत्र्यांमुळे झालेलं अडथळे दूर करणं यामध्ये त्यांनी स्वतः सहभागी होऊन मदत कार्यात भाग घेतला. ही तत्परता आणि सेवा वृत्ती पाहून नागरिकांनीही कौतुक व्यक्त केलं.

 

आपल्या पालकमंत्री व आमदार मा. ना. सौ. मेघना साकोरे बोर्डीकर या जिल्ह्याबाहेर असल्या तरी, त्यांचं कार्य, लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि “संकट काळात जनतेसोबत” ही भावना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जिवंत आहे.

“मेघनादीदींच्या मार्गदर्शनात आम्ही नेहमीच सज्ज आहोत,” असं नम्रपणे सांगत शहराध्यक्ष अशोक शेलार यांनी मदतकार्य चालू ठेवलं.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!