आपला जिल्हा

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत नूतन विद्यालयाचे घवघवीत यश

कु.सोलापुरे परिमलला ए ग्रेड प्राप्त तर सात जणांना मिळाला बी ग्रेड

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू शहरातील नूतन विद्यालय परीक्षा केंद्रावर कलासंचलनालय, मुंबई महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत ‘इंटरमिजिएट ग्रेड’ ग्रेड परीक्षेत नूतन विद्यालयाची विद्यार्थिनी कु. परिमल सोलापूरे हीला ए ग्रेड प्राप्त झाला तर लिपने यश प्रकाश, मानवतकर प्रथमेश, कापसे सुमेध, नागरे सिद्धांत, कु.मगर प्रगती, कु. पंडित तृप्ती, मोटे प्रथमेश यांना बी ग्रेड प्राप्त झाला.

यावर्षी शाळेचा निकाल 87 टक्के एवढा लागला आहे.

कला क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव डॉ. व्ही. के. कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, शाळेचे प्र. मुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक के के देशपांडे, डी. डी.सोन्नेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
यशस्वीतेसाठी चित्रकला विभाग प्रमुख आर. डी. कटारे, कलाशिक्षक फुलसिंग गावित, केशव डहाळे आदींनी पुढाकार घेतला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!