आपला जिल्हा

आमदार मेघना बोर्डीकर यांनी अनेक वर्षांचा रस्त्याचा प्रश्न लावला मार्गी.

सेलू, ता.०१ (प्रतिनिधी ) : शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधील वालूर नाका ते जिल्हा परिषद शाळा या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन ॲड. संजय लोया यांच्या हस्ते गुरुवारी (ता.०१) रोजी करण्यात आले. सदरिल रस्त्याची मागणी परिसरातील नागरिक अनेक वर्षापासून करित होते. अखेर आमदार मेघना बोर्डीकर यांच्या प्रयत्नामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक ॲड. दत्तराव कदम, शहराध्यक्ष अशोक अंभोरे, माजी नगरसेवक शिवाजीराव खेडकर, दिगंबर गोरे, ज्ञानेश्वर महाराज, सोपान चव्हाण, सुरेश खेत्रे, श्री. ढोबळे महाराज, गणेश गोरे, भारत पवार, वहीदभाई, कृष्णा गोरे, शेख शफिक, पाशाभाई आदींची उपस्थिती होती. सदरील रस्ता अनेक वर्षापासून खराब झाला होता. रस्त्यावर मोठ मोठी खड्डे पडले होते. त्यामुळे रहदारीस अडचण निर्माण होत होती. आमदार मेघनाताई बोर्डीकर यांनी रस्त्याची अडचण लक्षात घेऊन नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी २० लक्ष रुपयाचा निधी मंजूर करून आणला होता. यातून १३१ मीटर सिमेंट काँक्रिटीकरण करून रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे रहदारीचा प्रश्न सुटणार असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सेलू— रस्त्याच्या उदघाटन प्रसंगी अॅड. संजय लोया, अॅड. दत्तराव कदम, अशोक अंभोरे शिवाजी खेडकर आदी.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!