आपला जिल्हा

शासकीय रेखाकला परीक्षा नूतन विद्यालय केंद्रावर 92 विद्यार्थी ए ग्रेड प्राप्त

नूतन विद्यालयाचा इंटरमिजिएटचा 100 % निकाल

सेलू (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखा कला परीक्षा 2025-26 चा निकाल 9 जानेवारी रोजी जाहीर झाला.

नूतन विद्यालय केंद्रावर एलिमेंटरी आणि इंटर मिजिएट परीक्षेत तब्बल 92 विद्यार्थ्यांना ए ग्रेड तर 66 विद्यार्थ्यांना बी ग्रेड प्राप्त झाला.
नूतन विद्यालय सेलू केंद्राचा एलिमेंट्री परीक्षेचा निकाल 95. 80 तर इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल 99.9 असा लागला आहे.
या परीक्षेत नूतन विद्यालयाच्या दोन्ही परीक्षेत  44 विद्यार्थ्यानी ए ग्रेड प्राप्त केला तर 23 विद्यार्थ्यांना बी ग्रेड प्राप्त झाला. नूतन विद्यालय रेखा कला परिक्षेत एकूण 89 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
शासकीय रेखा कला परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे पदाधिकारी,  मुख्याध्यापक संतोष पाटील, उप मुख्याध्यापक के के देशपांडे,पर्यवेक्षक रोहिदास मोगल, शंकर बोधनापोड,शिक्षक कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
या परीक्षेच्या यशस्वीतेसाठी चित्रकला विभाग प्रमुख आर डी कटारे , कलाशिक्षक फुलसिंग गावित यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!