आपला जिल्हा

सेलू पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी प्रभाकर कवाळे यांनी पदभार स्वीकारला.

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी मोंढा पोलीस स्टेशन परभणी येथून बदली वरून आलेले प्रभाकर कवाळे यांनी नुकताच पदभारला स्वीकारला. त्या अगोदर कवाळे यांनी परभणी मोंढा पोलीस स्टेशन येथे दोनवर्ष कार्यरत होते.

याआधी सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून समाधान चौरे यांनी सेलूत आपला कार्यकाल चांगल्या हातोटीने सांभाळत कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही आणि सामान्यांना देखील कोणताही त्रास होणार नाही अशी काळजी घेत आपला कार्यकाल पूर्ण केला.
आज बुधवार दि. 31 जानेवारी रोजी त्यांची सेलू येथून मोंढा पोलीस ठाणे परभणी येथे बदली झाली. त्यांनी सेलू येथे कार्यरत असताना कोणतीही प्रसिद्धी अथवा बडे जावा पण न घेता आपले कार्य प्रामाणिक पणे पार पाडले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!