परभणी, दि.29 ( प्रतिनिधी ) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयामार्फत जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी 31 जानेवारी रोजी दुपारी 1 ते 2.30 या वेळेतत वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहितीबाबत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त प्र.सो.खंदारे व वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एस. नरवाडे मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींनी या ऑनलाईन सत्रामध्ये सहभाव नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त प्र.सो. खंदारे यांनी केले आहे.