आपला जिल्हा

विद्यार्थांना शिकवण्या पेक्षा शिकते करा – प्राचार्य डाॅ.विकास सलगर

सेलू ( प्रतिनिधी ) येणाऱ्या काळा सोबत शिक्षकांनी अद्ययावत रहावे.या दृष्टीने शिक्षक क्षमतावृध्दी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून या प्रशिक्षणातून नवीन अध्ययन अध्यापन व मूल्यमापन तंत्र अवगत करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन प्राचार्य डाॅ.विकास सलगर यांनी तालुकास्तरीय शिक्षक क्षमतावृध्दी प्रशिक्षण २.० सेलू येथील शारदा विद्यालय येथे शिक्षकांना मार्गदर्शन करताना केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की,विद्यार्थांना शिकवण्यापेक्षा शिकते करा.मुलं आपल्या गतीने चांगल्या पद्धतीने शिकून पुढे जातील.यावेळी जेष्ठ अधिव्याख्याता डाॅ.प्रल्हाद खुणे यांनी मार्गदर्शन करतांना शिक्षकांनी अभ्यासक्रम पूर्ण करताना,तो अभ्यास घटक विद्यार्थांना कितपत समजला आहे.यासाठी सातत्याने मूल्यांकन करून पडताळावे असे सांगितले.जेष्ठ अधिव्याख्याता तथा तालुका संपर्क प्रमुख गणेश शिंदे मार्गदर्शन करतांना म्हणाले की,आपण आपल्यातील सर्वोत्तम ते सर्व विद्यार्थ्यां पर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणे हे उत्तम शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे. यावेळी सुलभक म्हणून नवनाथ वाघमारे,गजानन शितळे,
आम्रपाली खाजेकर,प्रविण कुलकर्णी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तालुका प्रशिक्षण प्रमुख सुनिता काळे यांनी केले तर आभार शरद ठाकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!