आपला जिल्हा

सेलू तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लक्ष्मण बागल यांची फेरनिवड सचिव पदी शेख मोहसिन अहमद

सेलू ( प्रतिनिधि ) अखील भारतीय मराठी पत्रकार परीषद मुंबई संलग्न सेलू तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक दिनांक २७ जानेवारी शुक्रवार रोजी सांय ०६ वा शासकिय विश्राम गृह येथे आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत सेलु शहरातील व तालुक्यातील तसेच डिजिटल मीडिया सह पत्रकार बांधव उपस्थित होते .

प्रास्ताविक संघटनेचे सचीव शेख मोहसिन अहमद यांनी मागील वर्षभरात केलेल्या संघटनेच्या माध्यमातुन सांस्कृतिक कार्यक्रम, संघाचे मेळावे, समाजकार्य कार्याची माहीती विषद केली .यानंतर
सेलु तालुका मराठी पत्रकार संघाच्या सन २०२४/२५ करिता नीवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या मध्ये
सेलू तालुका अध्यक्षपदी लक्ष्मण बागल यांची फेरनिवड करण्यात आली तर सचीव शेख मोहसिन अहमद, कार्याध्यक्ष मुंढे संजय यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली .
पुढील कार्यकारिणी उपाध्यक्ष -अबरार बेग, कोषाध्यक्ष -दिलिप मोरे ,सहसचिव -पुनमचंद खोना ,सल्लागार -कांचन कोरडे ,मोहमद ईलियास ,संतोष गरड ,डि व्हि मुळे, सदस्य सर्वश्री निसार पठाण, अझगर पठाण, रामेश्वर बहीरट, रेवन अप्पा साडेगावकर, डाॅ विलास मोरे, पवार निळकंठ ,राहूल खपले, निशिकांत रोडगे, महादेव गीरी, रोहीत झोल , राधाकिशन कदम,या वेळी शहरातील व तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते .
निवडणुक पीठासीन अधिकारी म्हणून कांचन कोरडे यांनी काम पाहीले तर आभार निसार पठाण यांनी केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!