आपला जिल्हा
सेलू तालुक्यात दुधाची चळवळ गतिमान करणार -अशोक काकडे

सेलू ( प्रतिनिधी ) दिवसेंदिवस शेती व्यवसायाला कमी होत चाललेली निसर्गाची साथ, त्यामुळे आटत चाललेले नैसर्गिक स्रोत, दिवसेंदिवस शेतीचं कमी होत चाललेलं क्षेत्र, मागील दहा वर्षांपासून शेती मालाचे पडत चालेले भाव. आणि वाढत चाललेला महागाईचा भस्मासूर . कमी होत चालेलेले सरकारी रोजगार आणि वाढत चाललेली बेरोजगारी ह्या सगळ्या समस्या येणाऱ्या पिंढ्यांच अवसान गाळणाऱ्या आहेत.
म्हणून आता लोकांनाच लोकांचा लढा उभा करून शेती सोबतच आपले पर्यायी रोजगार उपलब्ध करावे लागतील हे ओळखून आम्ही बळीराजा संघर्ष समितीची स्थापना केली असून गावोगाव पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय उभे निर्धार केला असून येणाऱ्या काळात सेलू तालुक्यात दुध व्यवसायाची चळवळ गतिमान करणार असल्याचे प्रतिपादन बळीराजा संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक काकडे यांनी वालूर येथे केले.





