आपला जिल्हा

प्रिन्स च्या तेजश्री ची नासा प्रशिक्षणासाठी निवड

सेलू ( प्रतिनिधी ) दि.0७ श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू ची विद्यार्थ्यांनी तेजश्री महेश कुमार चौधरी वर्ग ६ वी हिची अमेरिकेतील नासाच्या अभ्यास व प्रशिक्षण दौऱ्यासाठी निवड झाली आहे.

नासाच्या यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटर येथे प्रशिक्षण कार्यक्रम निवडीसाठी परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाउंडेशन आणि सेडोर इंटरनॅशनलद्वारे २६ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. यात गणित, विज्ञान, भूगोल आणि बुद्धिमापन यावर आधारित प्रश्न होते. परीक्षेत राज्यातील ११, तर मराठवाड्यातील तीन विद्यार्थी पात्र झाले आहेत. ही परिक्षा देशातील विविध शाळांमध्ये घेण्यात आली होती. तेजश्रीने ही परिक्षा उत्तीर्ण केल्यामुळे तीला अंतराळ संशोधनाचा अभ्यास करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
या यशाबद्दल तेजश्रीचे पालकांसोबत श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांनी स्वागत व सत्कार केला. व पुढील नासा अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या.
परीक्षेच्या यशासाठी एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल मधील शिकवणारे सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच वेळोवेळी आम्हा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे डॉ संजय रोडगे यांचे ही मार्गदर्शन लाभले.
भविष्यात शास्त्रज्ञ होऊन अंतराळ क्षेत्रात करियर करून देशाचे नाव मोठे करायचे आहे, असे तेजश्रीने सांगितले.

यां सत्कार कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे, मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, अर्जुन गरुड उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!