आपला जिल्हा

परभणी जिल्ह्यात सरासरी 138.4 मिमी पाऊस

पाथरी तालुक्यात सर्वाधिक 229.5 मि.मी. पाऊस

परभणी, दि. 02 (प्रतिनिधी ) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 138.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, पाथरी तालुक्यात सर्वाधिक 229.5 मि.मी. पाऊस पडला आहे.

जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. परभणी 102.7 (632.6), गंगाखेड 100.8 (826.2), पाथरी 229.5 (735.5), जिंतूर 158.1 (774.3), पुर्णा 72.9 (598.8), पालम 100.4 (749.2), सेलू 181.2 (709.1) सोनपेठ 142.1 (782.8) आणि मानवत तालुक्यात 197.8 (737.9) पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहेत.

परभणी जिल्ह्यात दिनांक 1 जून 2024 ते 02 सप्टेंबर, 2024 पर्यंत सरासरी 718.7 मिलीमीटर पाऊस पडला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात गेल्या 24 तासात सरासरी 87.1 मि.मी. (680.6) पावसाची नोंद झाली आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!