सेलू ( प्रतिनिधी ) सेलू, न्यू हायस्कूल सेलू केंद्रावर आज नवोदय ची परीक्षा सुरळीत पार पडली. परीक्षा केंद्रावर एकूण 9 परीक्षा हॉल होते. 202 विद्यार्थ्यांपैकी 191विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. 11विद्यार्थी या परीक्षेस अनुपस्थित होते. न्यू हायस्कूल केंद्रावरील ही नवोदयची पहिलीच परीक्षा होती. उमेश राऊत, गटशिक्षणाधिकारी प स सेलू यांनी परीक्षेदरम्यान केंद्रास भेट दिली असता परीक्षा केंद्रात समाधान व्यक्त केले. केंद्र निरीक्षक म्हणून अंबेकर आर टी तर केंद्राध्यक्ष म्हणून धनंजय भागवत यांनी काम पाहिले. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शरद मगर,प्रा भाऊसाहेब निकम तर इनव्हिजिलेटर म्हणून प्रा. संतोष कुलकर्णी, तोटेवाड जी के, रोंटेवाड एस आर , सोळंके डी सी, पवार एक बी, कुरेशी एम आर,बेग एम एस,शिंदे सी यु, मोरे डी एस यांनी काम पाहिले.