आपला जिल्हा

नितीन क्रिकेट सेलू 24 धावाने विजयी

राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्व. नितीन लहाने स्मृती चषक

सेलू ( प्रतिनिधी )सेलू तालुका क्रिकेट संघटना, व नितिन व्यायाम शाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू नितीन व्यायाम शाळा कला, क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू द्वारा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमीत्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्व. नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा -२०२४

नूतन महाविद्यालय क्रिडांगण, सेलू येथे दि. 19 जानेवारी 2024 शुक्रवार रोजी सकाळी
सत्रातील सामना नितीन क्रिकेट क्लब सेलू विरुद्ध संकेत क्रिकेट क्लब संभाजीनगर दरम्यान नितीन सेलू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक करताना डॉ.संजय रोडगे, नितीन मंडळाचे अध्यक्ष मा .आ. हरीभाऊ लहाने. संयोजक गणेश माळवे,कल्याण पवार ,प्रा. नागेश कान्हेकर, उपस्थित होते.
नितीन सेलू संघाने 20 षटकात 158/8 गडी बाद झाले यात कर्णधार गजानन शेलार 28 दिपक 37धावा, सलमान सिद्दीकी 45, राजेश राठोड 11 धावा करत चौफेर फटकेबाजी करत सेलूकरांचे मन जिंकले.
संभाजीनगर संघाच्या वतीने गोलंदाजी करताना आकाश लोखंडे, 2 गडी तर सुरज जाधव, विनोद यादव प्रत्येकी 1-1 गडी बाद केले.
यांचे प्रतिउत्तर देताना संभाजीनगर संघाने 18 षटकात सर्व बाद 129 धावा केल्या यात अभिजित भगत18 आकाश लोखंडे 16 तुषार पवार 37, धावा करत तंबूत परतले. नितीन क्लब
.सेलूच्या राजेश राठोड 4 गडी ,संदिप लहाने व सिद्दीकी झिशांना प्रत्येकी 2-2 गडी प्रमोद गायकवाड 1 गडी बाद करून 24 धावांनी विजय प्राप्त केला.
सामनावीर पुरस्कार सेलू संघाचे राजेश राठोड यास कुणाल लहाने, प्रभाकर सुरवसे, वैजुडकर , सोळंके मंडळाचे अध्यक्ष मा.आ.हरीभाऊ लहाने यांच्या हस्ते देण्यात आला.
पंच प्रसाद कुलकर्णी, आसेर सिद्दीकी तर समालोच, शेख यासेर यांनी केले.
अविनाश शेरे, खाजा भाई, संजय लोया, बजरंग घरकुले, विनायक खंडागळे, परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!