आपला जिल्हा

युवराज पौळ, सेलू मुख्याधिकारी पदी आज कार्यभार स्वीकारणार

तर देविदास जाधव यांचीं पदोन्नतीने बदली

सेलू ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४(४) व ४(५) मधील तरतुदीनुसार, खाली नमूद केलेल्या महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी, गट-ब संवर्गातील अधिकाऱ्याची प्रशासकीय कारणास्तव सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने बदली करण्यात येत असून श्री. युवराज पौळ, मुख्याधिकारी, पुर्णा नगरपरिषद, जि. परभणी. यांची मुख्याधिकारी, सेलू नगरपरिषद, जि.परभणी. श्री. देविदास जाधव यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर होणार आहे. तसेच, श्री. देविदास जाधव यांना मुख्याधिकारी, सेलू नगरपरिषद, जि. परभणी या सध्याच्या पदावरुन दि.०९.०९.२०२४(म.नं.) पासून कार्यमुक्त करण्यात येत असून, त्यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. तर श्री. पौळ यांना दि.०९.०९.२०२४ (म.नं.) पासून त्यांच्या सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे. त्यांनी पदस्थापना दिलेल्या पदावर दि.१०.०९.२०२४ रोजी रुजू होवून, तसा अनुपालन अहवाल शासनास तात्काळ सादर करावा असे पत्रक शासनाचे अवर सचिव अ.का.लक्कस यांनी आदेशीत केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!