आपला जिल्हा

विद्यार्थी जीवनात अभ्यासाबरोबर पोषक आहार,व्यायाम ,मैदानी खेळाची गरज – डॉ.उमेश गायकवाड

सेलू ( प्रतिनिधी ) श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्परस स्कूलमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत मधुमेह व डोळ्यांचे विकार यावरील प्रतिबंधात्मक उपाय हा मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे संस्थापक डॉ. संजय रोडगे,प्रमुख उपस्थिती डॉ.उमेश गायकवाड, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर व शिक्षकवृंद उपस्थित होते.

डॉ.उमेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुलांच्या वाढत्या लठ्ठपणाची कारणे,मधुमेह विकार व डोळ्यांचे विकार इत्यादी चे कारणे व त्यावरील उपाययोजना एकदम सोप्या भाषेत समजावून सांगितले.तसेच विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी देखील मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे,जसे की पोषक आहार, व्यायाम,मैदानी खेळ इ.बाहेरील देशाच्या संस्कृतीचे अनुकरण करण्यापेक्षा आपल्या भारतीय संस्कृतीचा अवलंब करावा.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुदुस सर यांनी ,तर आभारप्रदर्शन दिपा सावंत यांनी केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!