आपला जिल्हा

हेमंतराव आडळकरांच्या सर्वोत्कृष्ट चेअरमन’ पुरस्काराने साईबाबा बँकेची राष्ट्रीयस्तरावर नोंद.

पाथरी बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांचे प्रतिपादन.

सेलू (प्रतिनिधी)  सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन करून बँक विस्तार, तंत्रज्ञान व आधुनिक व्यवस्थापन प्रणाली यातून वेगळेपण सिद्ध केल्याची दखल घेऊन दिल्ली येथील प्रमोटिंग अचिव्हमेंट फाउंडेशनच्या अत्यंत मानाचा सर्वोत्कृष्ट चेअरमन परफॉर्मन्स अ‍ॅवॉर्ड २०२३ या पुरस्कारासाठी निवड झाली. यामुळे साईबाबा बँकेच्या प्रगतीची राष्ट्रीयस्तरावर नोंद झाली आहे.असे मत पाथरी बाजार समीतीचे सभापती तथा वाल्मिकी बँकेचे चेअरमन अनिलराव नखाते यांनी व्यक्त केले.

सेलू येथील साईबाबा बँकेच्या सभागृहात सोमवारी दिल्ली येथील प्रमोटिंग अचिव्हमेंट फाऊंडेशन चा सर्वोत्कृष्ट चेअरमन परफॉर्मन्स अ‍ॅवॉर्ड २०२३ हा पुरस्कार मिळाल्याबदल सत्कारमुर्ती चेअरमन हेमंतराव आडळकर यांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी पाथरी बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी अनिलराव नखाते तर सत्कारमुर्ती हेमंतराव आडळकर,बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, मुख्यकार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे,संचालक दत्तराव आंधळे,सुभाष चव्हाण, रवि बोराडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना अनिलराव नखाते म्हणाले की,अर्थव्यवस्था, देवाणघेवाण, कल्याणकारी योजनांच्या माहितींचे संकलन करून, आरोग्य, शिक्षण, वाणिज्य आणि उद्योग, सामाजिक सेवा, बँकिंग सेवा देण्यासाठी सभासद व संचालक मंडळ यांचे समन्वयातून बँकेची प्रगती साधली.या कामकाजाची पोचपावती म्हणून प्रमोटिंग अचिव्हमेंट फाउंडेशन दिल्ली या संस्थेच्या राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट चेअरमन पुरस्कारासाठी हेमंतराव आडळकर यांचा निवड झाली.यातून बँकेची अधिकाधिक प्रगती निश्चितपणे साधली जाईल असे स्पष्ट केले.व्यवस्थापक संतोष हुगे यांनी सुत्रसंचालन केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!