परभणी ( प्रतिनिधी ) पालघर येथे कला शिक्षकांची राज्यस्तरीय ४२ वी कला शिक्षण परिषद बोर्डी , ता डहाणु जि पालघर येथे दि. १९ व २० जानेवारी २०२४रोजी होत असून या परिषदेस उपस्थित राहणाऱ्या कला शिक्षकांना विशेष नैमितिक रजा मिळणार असल्याचे आदेश परभणी शिक्षणाधिकारी प्राथमिक /माध्यमिक यांनी नुकतेच काढले आहेत.
संदर्भिय पत्रान्वये कला शिक्षकांची राज्यस्तरीय ४२ वी कला शिक्षण परिषद (कार्यशाळा), पालघर जिल्हयातील पे हायस्कुल माजी विदयार्थी संघाचे एस आर सावे कंम्पिंग ग्रांकड बोडी, ता डहाणु जि पालघर येथे दिनाक १९ व २० जानेवारी २०२४ (दोन दिवसीय) घेण्यात येणार आहे. त्यानुसार सदरील कला शिक्षण परिषदेस (कार्यशाळा) उपस्थित राहण्यास इच्छुक असणा-या आपल्या अधिनस्त असलेल्या कला शिक्षकास स्वखर्चाने उपस्थित राहण्याच्या तसेच सदर कार्यशाळेत उपस्थित राहिल्याबाचत्तचे उपस्थिती पत्रक सादर करण्याच्या अटिच्या अधीन राहुन विशेष नैमितिक रजा मंजुर करुन कार्यमुक्त करावे याची नोंद घ्यावी.परभणी शिक्षणाधिकारी प्राथमिक /माध्यमिक यांनी कळवले आहे.
पालघर येथे कला शिक्षकांची राज्यस्तरीय ४२ वी कला शिक्षण परिषदेस परभणी जिल्यातील जास्तीत जास्त कला शिक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माधव घयाळ विभागीय उपाध्यक्ष,छत्रपती संभाजी नगर विभाग,केशव लगड जिल्हाध्यक्ष कलाध्यापक संघ, परभणी यांनी केले आहे.