आपला जिल्हा

वसंत संगीत रजनी कार्यक्रमाला सेलूकरांचा उस्पुर्त प्रतिसाद

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील पेन्शनर्स असोसिएशनच्या विसावा सभागृहात दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी वसंत संगीत रजनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास सेलूकर रसिक श्रोत्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

यावेळी सेलू येथील कलाकारांनी एकास एक सरस वसंत बहार गीते सादर करून सेलूकरांना मंत्रमुग्ध केले.

सेलू शहरात गीत-संगीताचा वारसा पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीने पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे स्व. वसंतराव जोशी यांच्या स्मरणार्थ “वसंत संगीत रजनी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक नागेश देशपांडे तर संयोजक गंगाधर कान्हेकर, डॉ राजेंद्र मुळावेकर, डॉ शिवाजी शिंदे यांची मंचावर उपस्थिती होती. सच्चिदानंद डाखोरे, दिपक देवा, डॉ. राजेंद्र मुळावेकर, लक्ष्मीकांत दिग्रसकर, डॉ. विलास मोरे, संजय मंडलिक, विनोद मोगल, उल्हास पांडे, अनघा पांडे, पुजा तोडकर, रमा बाहेती, प्रिती राठी, सायली दिग्रसकर, आशा सावजी, मनिषा पांडे, हेमलता देशमुख आधी कलाकारांनी वसंत संगीत रजनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यावेळी सहभागी कलाकारांनी वसंत बहार या संकल्पनेवर आधारित एकास एक सरस गीते सादर करून सेलूकारांना मंत्रमुग्ध केले. सूत्रसंचालन प्रिती सराफ तर रविंद्र मुळावेकर, शेख उस्मान, कृष्णा आळणे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. वसंत संगीत रजनी या कार्यक्रमात सेलूतील रसिकांची यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!