आपला जिल्हा
योजनेतंर्गत बँकेकडे आलेले प्रस्ताव प्राधान्याने मंजूर करा – अध्यक्ष नरेंद्र पाटील
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

परभणी, दि.9 (प्रतिनिधी ) : राज्यातील तरुण/ तरुणींना स्वतःचा स्वयंरोजगार सुरु करण्यास इच्छुकांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प व्याज परतावा योजना सुरु करण्यात आली असून, या योजनेतंर्गत बँकेकडे आलेले कर्ज प्रस्ताव सकारात्मकता ठेवत प्राधान्याने मंजुर करा, अशा सूचना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिल्या.




