आपला जिल्हा

सेलू तालुक्यातील गावागावात सत्यशोधक चित्रपाटाचे पोस्टर लावून जनजागृती

सत्यशोधक टॅक्स फ्री करून शाळा कॉलेज मधील विद्यार्थ्यांना दाखवण्याची मागणी

सेलू ( प्रतिनिधी ) महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित सत्यशोधक चित्रपट सर्वत्र हाऊस फुल्ल होत असून सेलू तालुक्यातील गावागावात सत्यशोधक चित्रपाटाचे पोस्टर लावून जनजागृती करण्यात येत आहे.

फुले दाम्पत्यांनी स्त्री शिक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य धन संपत्ती समाज सुधारण्यासाठी झोकून दिली मागास समाजाला गुलामीतून बाहेर काढण्यासाठी जीवाची पर्वा केली नाही त्यांच्या कार्यामुळेच आज स्त्री शाळेत शिकू शकते या महान कार्याची विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी शासनाने सत्यशोधक चित्रपट टॅक्स फ्री करून महाराष्ट्रातील शाळा कॉलेज साठी फ्री शो आयोजित करण्याची मागणी सेलू तालुक्यातून होत आहे.

09 जानेवारी रोजी सेलूतील मीनाक्षी टॉकीज मध्ये शो होत असल्यामुळे सेलू तालुक्यातील गावागावात या चित्रपटची पोस्टर लावणे सुरु आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!