आपला जिल्हा

एसपीएल क्रिकेट स्पर्धेत गटकळ ॲकडमी विजेता तर रेसोई वॉरियर्स उपविजेता

सेलू ( प्रतिनिधी )साईराज बोराडे मित्र मंडळ आयोजित २०२४ च्या एसपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये रामेश्वर गटकळ यांच्या गटकळ करिअर अकॅडमी संघाने तिसऱ्या एसपीएल करंडक क्रिकेट स्पर्धेत प्रथम पारितोषिक ४१०००/- रु पटकाविले, तर शशांक टाके यांचा रसोई वॉरियर्स २१०००/- रु पारितोषिक उपविजेता ठरला आहे.

माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त साईराज बोराडे मित्र मंडळातर्फे या स्पर्धा आयोजिण्यात आल्या होत्या. एकूण आठ संघ सहभागी झाले होते. नूतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर चार दिवस चाललेल्या या स्पर्धेतील अंतिम सामना शनिवारी अत्यंत चुरशीचा झाला. रंगला यामध्ये रामेश्वर गटकळ यांच्या गटकळ अकॅडेमी या संघाने ४१ हजार रुपयांचे रोख प्रथम पारितोषिक व करंडक जिंकला. शशांक टाके यांचा रसोई वॉरियर्स संघ उपविजेता राहिला. त्यांना रुपये २१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व करंडक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, प्रसाद महाराज काष्टे, कपिल पडुळ, अमर सुरवसे यांची उपस्थिती होती लीगचे नियोजन अमर सुरवसे यांनी यशस्वीपणे पार पाडले. क्रिकेट प्रेमींसाठी , प्रायोजक सर्वांसाठी साईराज बोराडे यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!