महाराष्ट्र

ओबीसी नेते मा. छगनरावजी भुजबळ यांनी पाहिला “सत्यशोधक” चित्रपट.

सर्वांनी चित्रपट पाहिलाच पाहिजे त्यांनी केले आवाहन.

नासिक ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे अन्न व पुरवठा नागरी पुरवठा मंत्री ओबीसी नेते मा. ना. छगनरावजी भुजबळ यांच्यासाठी नाशिक येथे “सत्यशोधक” या चित्रपटाचा विशेष शो आयोजित केला होता. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी शोषितासाठी केलेला संघर्ष पाहून भुजबळ साहेबांचे डोळेही पानावले.

याप्रसंगी माजी आमदार तथा या चित्रपटात उस्मान शेख ची भूमिका करणारे प्रा. तुकाराम बिडकर, चित्रपट निर्माते आप्पासाहेब बोराटे, सहनिर्माते शिवा बागुल तथा चित्रपटाचे कलावंत, महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी ईतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. “सत्यशोधक” चित्रपट अतिशय सुंदर झाला असून त्यातील कलावंत तथा चित्रपटाचे निर्मिते, दिग्दर्शक, यांचे त्यांनी कौतुक करून हा चित्रपट प्रत्येकाने आपल्या कुटुंबासह पाहिलाच पाहिजे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!