आपला जिल्हा

हरवलेल्या चिमुकलीला दामिनी पथकाने शोधून केले पालकांच्या स्वाधीन

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील केशवराज बाबासाहेब यात्रेत मंगळवार दि.02 जानेवारी रोजी 03 वर्षाची चिमुकली शाबीरा शेख यात्रेत हरवली होती या प्रकरणी सेलू पोलीसांच्या दामिनी पथकाने चिमुकलीच्या पालकांचा शोध घेऊन एका तासात पालकांच्या स्वाधीन केले.


या पथकात पोलीस उपनिरीक्षक पुरी मॅडम, पोलीस हवालदार अस्मिता मोरे, पोलीस कॉन्स्टेबल बारवकर यांनी महत्वाची कामगिरी निभावली या कामगिरी मुळे पालकांकडून दामिनी पथकाचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!