आपला जिल्हा
शेतकऱ्यांचा कापूस विक्री प्रकरणी सेलुत रस्ता रोको
खाजगी बाजार समितीत कापूस नेण्यावरून शेतकरी आक्रमक

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला कापूस खाजगी बाजार समितीत आणण्याचा आरोप करून शेतकऱ्यांनी या विरोधात सेलू पाथरी रोड अडवून रास्ता रोको केला.
याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चक्रधर पौळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस यार्डत कापूस विक्रीसाठी आणला असता व्यापारी खाजगी बाजार समितीमध्येच आपला कापूस विक्री करावा असे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. परंतु शेतकऱ्यांना आपला कापूस कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथे विकायचा असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्याचे सांगितले.
खाजगी बाजार समितीचे रामेश्वर राठी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे म्हटले आहे की आमचं सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यासोबत करार केला असून त्या करारानुसार सोमवार मंगळवार बुधवार या दिवशी शेतकऱ्यांनी आपला कापूस कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू यांना विकावा व गुरुवार शुक्रवार शनिवार या दिवशी शेतकऱ्यांनी आपला कापूस खाजगी बाजार समितीत विकावा असे ठरलेले आहे. आज गुरुवार असल्याने शेतकऱ्यांनी आपला कापूस खाजगी बाजार समितीमध्ये विकावा असे सांगण्यात आले असेल अशी प्रतिक्रिया दिली.