आपला जिल्हा
विद्यार्थ्यांनी जाणून घेतले बँकेचे कामकाज ‘साईबाबा बँकेत रमले ‘जैन कॉम्पुटर ‘चे विद्यार्थी

मानवत . प्रतिनिधी,सहकारी बँकिंगमधील संचालक मंडळाचे कामकाज, कर्ज प्रक्रिया, विविध प्रकारच्या सेवा, ऑडिट तपासणी, सभासदांचे हक्क व त्यांना मिळणारे लाभ…अशा नागरी सहकारी बँकांचेचे कामकाज विद्यार्थ्यांनी नुकतेच जाणून घेतले. मानवत येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेच्या शाखेला जैन कॉम्पुटर विद्यार्थ्यांनी दिनांक 04/01/24 गुरवार दुपारी 12वाजता भेट देऊन बँकेच्या कामकाजाची माहिती घेतली. ओळख बँक कामकाजची या विषयावर भेटीच्या वेळी बँकेचे सुरू असलेले कामकाज, अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ, ठेवीदार व खातेदारांशी त्यांचा होणार संवाद समजून घेण्यात विद्यार्थी रमले.




