परभणी ( प्रतिनिधी) शिक्षक समन्वयक संघ महाराष्ट्र राज्य यांनी विविध मागण्यासाठी दि. 8 व 9 जुलै 2025 रोजी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. त्या आंदोलनास मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला आहे.
पाठींबा दिल्याचे पत्र जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना देण्यात आले. या निवेदनावर परभणी जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद, जिल्हासचिव निशांत हाके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.सेलू तालुक्यातून तालुकाध्यक्ष डॉ. संतोष मालसटवाड, सचिव विजेंद्र धापसे पुढाकार घेत आहेत.