आपला जिल्हा

सेलू प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा शानदार उद्घाटन

साईराज भैय्या बोराडे मिञ मंडळ आयोजित

सेलू ( प्रतिनिधी ) : सेलू् येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर साईराज भैय्या बोराडे मिञ मंडळ आयोजित तिसऱ्या सेलू प्रीमियर लीगच क्रिकेट स्पर्धा उद्घाटन बुधवारी, ३ जानेवारी रोजी झाले. उद्घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वेळी मुकेशराव बोराडे, (खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष)माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, माजी उपनगरध्यक्ष प्रभाकर सुरवसे, साईराज बोराडे, मारोती चव्हाण, मिलिंद सावंत, राजेंद्र पवार, प्रसाद महाराज काष्टे, सहायक पोलिस निरीक्षक अशोक जटाळ, गौतम धापसे, शेख दिलावर, व्यंकटेश चव्हाण, रमेश दौड, सचिन कोरडे, विठ्ठल काळबांडे, राजेंद्र केवारे, लक्ष्मण बुरेवार आदींची उपस्थिती होती.

पाच दिवसीय स्पर्धा आयोजिण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत आठ वॉरियर्स टीम प्रायोजकत्व न्यु.मॉर्डन सी.सी(अमर सुवरसे )किंग्स एलेव्हन (अभी शिंदे) , जिजाऊ वॉरियर्स (सचिन डासाळकर) नूतन क्रिकेट क्लब (सोमेश्वर राऊत), गटकळ करिअर ॲकडमी(रामेश्वर गटकळ), प्रिन्स वॉरिर्यस (डॉ.संजय रोडगे) रसोई वॉरियर्स (शंशाक टाके) माऊली सुपरकिंग्ज (प्रसाद काष्टी महाराज) या आठ संघाचे आहे.
गटकळ ॲकडमी वि. प्रिन्स वारियर्स संघामध्ये पहिला सामना झाला. या धावते समालोचन इरफान पठाण, यासेर शेख करीत आहेत.‌ गुणलेखक अभिजित चव्हाण. ७ जानेवारीला अंतिम सामना आहे. विजेत्यांना रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!