आपला जिल्हा

न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती साजरी

 सेलू ( प्रतिनिधी ) सेलू, येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती साजरी करण्यात आली.
 सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई यांच्या जिवन कार्यावर आपले मनोगत,गिते, ओव्या सादर केल्या. वक्तृत्व स्पर्धेत दुर्गा मगर प्रथम, सचिन कसबे द्वितीय,पायल राऊत तृतीय तर अश्विनी रणखांबेस उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. ब-याच विद्यार्थिनी सावित्रीबाईंच्या पोषाखात उपस्थित होत्या.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य धनंजय भागवत तर प्रा भाऊसाहेब निकम, दिनकर नखाते मंजुशा बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्रनयना तेलगोटे, धनंजय मोरे यांनी फुलेंच्या कार्याविषयी मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर गाडेकर यांनी केले.तर आभार प्रा संतोष कुलकर्णी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!