आपला जिल्हा

आयुर्विमा कर्मचारी विकास अधिकारी संयुक्त कृती समितीच्या वतीने निदर्शने

सेलू ( प्रतिनिधी ) : सेलू येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सेलू शाखेचे कार्यालय समोर आज दिनांक 3/1/2024 रोजी संयुक्त कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आले कर्मचारी, विकास अधिकारी,अधिकारीच्या काही महत्त्वाच्या मागण्यां साठी एल आय सी मधील युनियन च्या संयुक्त कृती समितीने संपा ची घोषणा केली आहे *01ऑगस्ट 2022 पासून देय वेतनाच्या सूधारणे साठी वाटा घाटी त्वरित सुरू करणे* *NPS मध्ये व्यवस्थापनाचे योगदान 10 वरुन 14 टक्केयां पर्यंत वाढवावे*.*सर्व संवर्गामध्ये पूरेशी भरती करावी* कर्मचारी, विकास अधिकारी,अधिकारी यांच्या प्रश्नांवर व्यवस्थापनाच्या एक तर्फी वृत्तीच्या विरोधात संयुक्त आघाडी ची एकजूट बळकट करून आणि आंदोलनात्मक कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणी साठी कृती समितीचे वतीने 03 जानेवारी 2024 रोजी लंच आवर मध्ये निदर्शने करण्यात आले 10 जानेवारी 2024 रोजी दुपारी एक तासाचा वाक -आऊट स्ट्राइक करण्यात येईल या संयुक्त कृती समितीमध्ये 1) फेडरेशन ऑफ एल आय सी ऑफ इंडिया क्लास I ऑफिसर्स असोसिएशन 2) नेशनल फेडरेशन ऑफ इन्शुरन्स फिल्ड वर्कर्स ऑफ़ इंडिया(NFIFWI)3) ऑल इंडिया इंन्शुरन्स एम्प्लॉइज एसोसिएशन (AIIEA)4) ऑल इंडिया एल आय सी एम्प्लॉइज फेडरेशन(AILEF)या संघटनेच्या वतीने निदर्शने व संप पुकारला आहे या निदर्शने मध्ये उपेंद्र बेल्लूरकर, भास्कर हिप्परगे, प्रदीप कानकटे, शमशोदीन शेख सहभागी झाले होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!