आपला जिल्हा

कापूस खरेदी मधील शेतक-यांचे अडचणी सोडविण्याचे तहसीलदार यांना दबाव गटाचे साकडे

परभणी ( प्रतिनिधी ) सध्या सी. सी. आय. मार्फत होणारी कापूस खरेदी मधील शेतक-यांचे अडचणी सोडविण्याचे साकडे सेलू तालुका दबाव गट यांनी सेलू तहसीलदार यांना एक निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, सध्या सी.सी. आय. ने कापूस खरेदी सुरू केलेली आहे. खुल्या बाजारात सध्या कापूस रु. ६८००/- प्रति क्विटंल दराने खरेदी सुरु आहे. सी. सी. आय रु.७०२०% प्रमाणे खरेदी करीत आहे.अनेक शेतक-यांनी खरीप पिकांची ई-पिक नोंदणी केलेली नाही. त्यामुळे सी. सी. आय. त्यांचा कापूस खरेदी करीत नाही. 2023-2024 चा पिक पेरा नोंद नसल्याने शेतक-यांची मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे. आता ई. पिक नोंदणी बंद आहे.आधीच शेती व्यवसायाचे पहिल्यांदा कमी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामध्ये बाजारात शेती माल कापूस, सोयाबीनला अत्यंत कमी भाव आहे. कापूस बाजारात आणण्यास वाहन भाडे ही मोठ्या प्रमाणात लागत आहे.चालू खरेदीसाठी शेतक-यांना संबंधीत तलाठी यांच्या कडून सन २०२३-२४ साठी पिक पेरा नोंद घेऊन त्या आधारावर सी. सी. आय. खरेदी करण्याबाबत त्यांनी शेतक-यां संधी द्यावी ही विनंती आहे. तरी आपण या प्रकरणी व्यतिश: लक्ष घालून संबंधीत स्थानिक सी. सी. आय. प्रतिनिधी यांना या बाबत शेतकऱ्यांची अडवणूक न करण्या संदर्भात योग्य त्या सूचना देऊन कापूस खरेदी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या निवेदनावर अँड. श्रीकांत वाईकर, इसाक पटेल, ओमप्र‌काश चव्हाळ, गुलाब पोळ, अँड. टी. ए. चव्हाण, उध्दव सोळंके, दिलीप मगर, मुकुंद रेकाळे, परमेश्वर वीर, रामचंद्र कांबळे, अॅड. देवराव दळवे, लक्ष्मण प्रधान,विलास रोडगे, नारायण पवार, गणेश सोळंके, अॅड. उमेश काष्टे, आबासाहेब भुजबळ, अजित मंडलीक, अॅड. •अँड. योगेश सुर्यवंशी, अॅड. पांडुरंग आवटी, लिंबाजी कलाल, दत्ताराव कांगणे, चिंतामन दोंड, गणेश मुंढे, चंद्रकांत चौधरी, अब्दूल रौफ, सय्यद जलाल, गणपत मिटकरी, सतिश काकडे, राजेंद्र गवारे, दिलीप शेवाळे, सोनू शेवाळे,शे.मतीन दादामिया, उत्तम गवारे, डॉ. गणेश थोरे आदींच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!