आपला जिल्हा

राज्य उत्कृष्ट निर्यात पुरस्कार मिळाल्याबद्दल सेलूतील बाहेती बंधूंचा सगेसोयरे व मित्रमंडळाच्या वतीने सन्मान

□ 'कोहिनूर रोप्स' ला राज्य सरकारचा उत्कृष्ट निर्यात पुरस्कार

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील प्रसिद्ध कोहिनूर रोप्स प्रायव्हेट लिमिटेड या उत्पादक कंपनीला वर्ष २०१८ ते २०२१ असा सलग तीन वर्षे राज्य सरकारच्या उद्योग संचालनालयाच्या वतीने ‘महाराष्ट्र स्टेट एक्सपोर्ट अवार्ड’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या सुवर्ण पुरस्काराने उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुणे येथे गुरुवार दि. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी विशेष समारंभात  गौरविण्यात आल्याबद्दल सेलू येथील सगेसोयरे व मित्रमंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

कोहिनूर रोप्सचे कार्यकारी संचालक तथा उद्योजक नंदकिशोर बाहेती, बल्लभ बाहेती, चेतन बाहेती व महेश बाहेती यांनी हा सन्मान स्विकारला. यावेळी दैनिक सिद्धेश्वर समाचारचे मुख्य संपादक सुर्यप्रकाश धुत, नवलकिशोर काबरा, ब्रिजगोपाल काबरा, शेतकरी संघटनेचे किशोर जोशी, ग्राहक पंचायतचे प्रांत अध्यक्ष डाॅ विलास मोरे, व्यंकटेश काबरा, सुधाकर पवार, शामसुंदर काबरा, सर्वेश काबरा, महेश काबरा, दिगांबर पवार आदींची उपस्थिती होती. दरम्यान काबरा परिवाराच्या वतीने देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन दैनिक सिद्धेश्वर समाचारचे मुख्य संपादक सुर्यप्रकाश धुत यांनी केले.
प्लास्टिक उत्पादन सेक्टरमधील सुवर्णसन्मान प्रमाणपत्र व रोख ५१ हजार रुपये असे राज्य सरकारने दिलेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुणे येथील हॉटेल टिप टॉप इंटरनॅशनल येथे उद्योग विभागाच्या वतीने राज्य निर्यात पुरस्कार आणि सामंजस्य करारावर स्वाक्षरी समारंभ आयोजिण्यात आला होता. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपिन शर्मा, विकास व निर्यात आयुक्त (उद्योग) दीपेंद्र सिंह कुशवाह आदींसह मान्यवरांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दर्जेदार उत्पादन करून निर्यात क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल या कोहिनूर रोप्सला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!