आपला जिल्हा
भगवान श्रीराम म्हणजे मूर्तिमंत धर्म : स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज
सेलूत श्रीराम कथेची उत्साहात सुरुवात

सेलू, दि.१६, प्रतिनिधी : रामकथेची किती संस्करणे निघावेत ? रामकथांची संख्या २०० पेक्षा अधिक आहे. रामचंद्रांचा गोडवा इतका आहे की; परिचय झाला की आपोआप वेड लागते. एवढेच नव्हे तर कथेचे श्रवण करणारांना संपूर्ण वैदिक धर्म काय आहे ? हे आपोआप कळते. धर्म म्हणजे काय ? हे कळून घ्यायचे असेल, तर भाराभर ग्रंथ वाचण्याची गरज नाही. भगवान श्रीराम म्हणजे मूर्तिमंत धर्म असल्याचे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले आहे.




