आपला जिल्हा

सेलूच्या नूतन विद्यालयातील क्रीडा शिक्षक सतीश नावाडे यांचा सेवागौरव सोहळा कार्यक्रम संपन्न

सेलू  ( प्रतिनिधी ) सेलू येथील नूतन विद्यालयातील क्रीडाशिक्षक सतीश नावाडे यांचा सेवानिवृत्ती निमित्त शनिवारी, ३० डिसेंबर रोजी सेवागौरव सोहळा उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. याप्रसंगी सचिव प्राचार्य डॉ.व्ही.के. कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी. राज्य खो-खो मार्गदर्शक संजय मुंढे, क्रीडा अधिकारी, शैलेंद्र गौतम , प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील, सतीश नावाडे, अनुराधा नावाडे, उज्ज्वला लड्डा यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी संस्थेच्या वतीने सतीश नावाडे यांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पहाराने, तर शाळेतर्फे भेटवस्तू देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला. विविध घटक संस्थां, सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या वतीने नावाडे यांचा सत्कार करण्यात आला. गणेश माळवे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. सतीश नावाडे यांनी मनोगतातून संस्था व शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. संगीत शिक्षक सचिंदानंद डाखोरे व संचाने स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक संतोष पाटील यांनी केले. सतीश नावाडे यांच्या कार्यावर प्रकाश टाकणार्‍या महाराष्ट्र स्पोर्ट्स दैनिकाच्या सेवा गौरव विशेषांकाचे प्रकाशन झाले. डॉ.एस.एम.लोया यांनी अध्यक्ष समारोप केला. सूत्रसंचालन डी.डी.सोन्नेकर व के.डी.पल्लेवाड यांनी केले. संतोष मलसटवाड यांनी आभार मानले‌. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सतीश नावाडे यांचे स्नेही, कुटुंबियांची उपस्थिती होती.

सरावामध्ये सातत्य ठेवा

सकाळी नूतन विद्यालयात प्रार्थना मैदानावर सतीश नावाडे यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.या वेळी प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील, के.के.देशपांडे, डी.डी.सोन्नेकर, पी.टी.कपाटे, उज्ज्वला लड्डा, संतोष मलसटवाड, प्रशांत नाईक आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना नावाडे म्हणाले की; अभ्यास आणि खेळ यामध्ये सातत्यपूर्ण सराव महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांनी सराव आणि त्यातील सातत्य कायम ठेवल्यास यश हमखास मिळते, असे नमूद केले.

संस्थेला एक लाखांची देणगी

क्रीडा शिक्षक सतीश नावाडे यांनी २४ वर्षे नूतन विद्यालयात सेवा दिली. क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांनी नावाडे यांना गौरविण्यात आले आहे. विविध खेळ प्रकारांमध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू नावाडे यांनी घडविले. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सतीश नावाडे यांनी मनोगतातून संस्था व शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच संस्थेच्या विद्यार्थी व खेळाडू विषयक उपक्रमांसाठी एक लाख रुपये देणगी जाहीर केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!