आपला जिल्हा

ओडिसी नृत्याविष्काराची सेलूकर रसिकांना भुरळ….!

सेलू दि.३०(प्रतिनिधी)-संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवात शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण म्हणून तरुणाई मोठ्यासंख्येने उपस्थित होती.

महागामी गुरूकूल संभाजीनगर येथील विद्यार्थीनी कु.शितल भांबरे,ऐश्वर्या मुंदडा,अद्या शिंदे यांनी अतिशय सुरेख असे ओडिसी नृत्य सादर केले.नृत्यगुरू पार्वती दत्ता यांनी नृत्यबद्ध केलेली ज्ञानेश्वरीच्या १८व्या अध्यायातील
चंद्र तेथे चंद्रिका…शंभू तेथे अंबिका…ओवी वरील नृत्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

प्रारंभी नृत्यांगनांनी रविंद्रनाथ टागोरांच्या “जागो निर्मल नेत्रे” या गीतावर मंगलाचरण सादर करून त्यानंतर
ओडिसी नृत्यातील पारंपारिक ‘कल्याणी पल्लवी ‘ हा नृत्य प्रकार सादर केला. त्यानंतर ‘गीत गोविंद’मधील भगवान विष्णूचे दशावतार सादर करतांना नर्तिकांचा मुद्राभिनय अतिशय बोलका होता.त्यांच्या सादरीकरणातील चापल्य,लालित्यपूर्ण पदन्यास एकूणच अविष्करण अतिशय लोभस असे होते.या युवतींचा सत्कार सुरेखा यशवंतराव चारठाणकर,वसुधा महेश खारकर,कल्याणी पाठक यांच्या हस्ते करण्यात आला.आभारप्रदर्शन जयश्री सोन्नेकर यांनी केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!