आपला जिल्हा

नूतनचे क्रीडा शिक्षक श्री सतीश नावाडे यांचा सेवागौरव समारंभ

सेलू ( प्रतिनिधी ) आज नूतन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री सतीश नावाडे सर सेवानिवृत्त होत आहेत.

त्यांना भावी आरोग्यदायी , आनंदी आयुष्यासाठी नूतन विद्यालय परिवाराकडून सेवागौरव समारंभ आयोजित केला आहे.

सेवेमध्ये असताना नावाडे यांनी नम्रपणे आपले शैक्षणिक कार्य करताना  क्रीडा क्षेत्रात भरीव असे योगदान देत सरांनी निरपेक्षपणे राज्य, राष्ट्रीय पातळीवरील अनेक खेळाडू घडवलेत. शालेय दैनंदिन कामकाज असो वा क्रीडांगण आपली कर्माची नाव सक्षमपणे यशाच्या किणाऱ्यावर नेणारे ते कार्यकुशल क्रीडाशिक्षक म्हणून आपला कार्यकाळ जोपासला.

रोखठोक आणि स्पष्टोक्ती माणसं आतून निर्मळ असतात. अशा माणसांना समजून घेणे तसे अवघडच असते. असेच संवेदनशील श्री सतीश नावडे सर आपल्या नव्या सहकाऱ्यांनाही सांभाळून घेत… विद्यार्थीप्रिय क्रीडा शिक्षक श्री सतीश नावडे सरांना वाढदिवस आणि सेवा गौरवाच्या नूतन परिवाराकडून मनापासून शुभेच्छा.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!