आपला जिल्हा

सुशिक्षित बेरोजगारांसाठी जागेवर निवड संधी बुधवारी

परभणी, दि. 08 ( प्रतिनिधी ) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय तंत्र प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने सुशिक्षित बेरोजगारांसाठी मेळाव्यामध्ये उद्योजक, तंत्र प्रशाला, नारायण चाळ येथे बुधवार, (दि. 13) जागेवर निवडसंधीचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहीमेअंतर्गत श्री कॅम्पुटर, जिंतूर या कंपनी मध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर, कॉम्पुटर ट्रेनर आणि शिपाई या पदाकरीता भरती करण्यात येणार आहे तसेच ऑनलाईन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी सहभाग नोंदवावा तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक 02452-220074 वर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त प्र.सो.खंदारे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!