आपला जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला जिल्हाध्यक्षपदी भावनाताई नखाते यांची निवड.

बुधवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार व महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी दिले नियुक्ती पत्र.

परभणी : ( प्रतिनिधी )राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) परभणी महिला जिल्हाध्यक्षपदी माजी जि.प.उपाध्यक्षा भावनाताई अनिलराव नखाते यांची निवड झाली आहे.

बुधवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) परभणी महिला जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र भावनाताई नखाते यांना दिले आहे.या नियुक्ती पत्रात आपली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या परभणी महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे.आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष,सुनीलजी तटकरे,राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी प्रयत्नशील रहावे, पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाला आपले सहकार्य राहील असा विश्वास आहे. आपल्या कार्यास शुभेच्छा व निवडीबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन असे नमुद केले आहे.यावेळी आ.बाबाजाणी दुर्राणी ,आ.विक्रम काळे ,पाथरी बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.आगामी निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) या पक्ष संघटन व महिला सक्षमीकरणासाठी हि निवड महत्वाची मानली जात आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरातून भावनाताई नखाते यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!