आपला जिल्हा

शुक्रवारी पाथरी शहर बंदची हाक…. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरील हल्याच्या निषेधार्थ

मा. ना. छगनराव भुजबळ साहेब यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ आळा घाला. त्यांना गोळी मारून ठार करण्याच्या धमक्या देणाऱ्यांच्या मुसक्या आवळा

पाथरी ( प्रतिनिधी ) मा. ना. छगनराव भुजबळ साहेब यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ आळा घालावा तसेच त्यांना गोळी मारून ठार करण्याच्या धमक्या आल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे. धमकी देणान्या समाजकंटकास गुन्हा दाखल करून त्वरीत अटक करण्यात यावी. तसेच मा. श्री. गोपिचंद पडळकर साहेब यांच्यावर इंदापुर येथे झालेल्या चप्पल फैक प्रकरणी तपास करून सदर व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा. सदर प्रकरणी समस्त ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.

 

तरी ओबीसी बांधवांच्या वतीनेशुक्रवार दि. 15.12.2023 रोजी पाथरी शहर बंद करून निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याचे निवेदन सकल ओबीसी समाजाच्या वतीने पाथरी तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!