आपला जिल्हा

श्रीराम प्रतिष्ठान येथे सुरभि महोत्सवाचे आयोजन

सेलू:( प्रतिनिधी ) येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभि महोत्सव २०२३ चे आयोजन उद्या ता.२४ ते २९ डिसेम्बर २०२३ दरम्यान विद्याविहार संकुल येथे करण्यात आले आहे.

सुरभि महोत्सावाच्या स्पोर्ट्स डे (ता.२४) सकाळी ९.००वा या दिनी घटक संस्थेतील सर्व शाळाच्या विद्यार्थ्यांचे संचलन, लेझीम. अरेबिक्स, मनोरे आदी विविध क्रीडा प्रकारचे सादरीकरण करतात. साई नाट्य मंदिल येथे २४ डिसेम्बर सकाळी ९.००वा वैयक्तिक नृत्य स्पर्धा, तसेच क्युरिअस कीड्स, फिनकीडस व पॉस्परस पब्लिक स्कूलचा “ FOLK DANCE OF INDIA ” (ता.२९) डिसे. वेळ सायं.०५ वा आयोजन करण्यात आले आहे. प्रिन्स इंग्लिश स्कुल सांस्कृतिक कार्यक्रम “ TRANSITION A CHANGE IN WORLD ” या वर आधारीत कार्यक्रमाचे (ता.२८) डिसे. वेळ सायं.०५ वा आयोजन करण्यात आले आहे. जिज्ञासा बालविहार व ज्ञानतीर्थ विद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम “ रंग मराठी मातीचा ” तसेच शिवपुत्र संभाजी महानाट्य या नाटिकेचे सादरीकरण (ता.२8) डिसे. वेळ सायं.०५.३० वा विद्यालयाचे कार्यक्रम आयोजित केले आहे. प्रिन्स आदिवासी प्रकल्प व समाज कल्याण सांस्कृतिक कार्यक्रम “ महाराष्ट्राची लोकधारा ” (ता.२९) डिसे. वेळ सकाळी १० वा आयोजन करण्यात आले आहे.
अपूर्वा पॉलीटेक्निक, आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, डी.एड, बीएड सांस्कृतिक कार्यक्रम व (ता.२९) डिसे. वेळ साय ०५ वा आयोजन करण्यात आला आहे. तसेच आनंद मेळावा २6 ते २९ डिसेबर दरम्यान आयोजीत करण्यात आले आहे.
छंद सम्राट बहुउद्देशीय संस्था, नागपुर प्रस्तूत ऐतिहासिक वस्तुंच्या संग्रहाचे प्रदर्शन ता २७ ते २९ डिसें.२०२३ सकाळी ०९ ते ०५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये विविध देशातील नोटा संग्रह, युनिक शंख व शिंपले संग्रह, विदेशी माचीस व नाणी संग्रह, इतिहासकालीन कोर्ट स्टॅम्प, इतिहासकालीन शस्त्र संग्राहक, अद्भुत मायक्रो आर्ट वर्क, कला, आटोग्राफ सोबत फोटोग्राफ संग्रह, मिनियचर प्लेन मॉडेल संग्रह, अपसाईड डाऊन रायटिंग कला, ऐंटिक ओरिओगामी वस्तु संग्रह, आदि संग्रहाच्या प्रदर्शनास सेलू शहरातील विद्यार्थी, पालक व नागरीकांनी वरील प्रदर्शनास भेट द्यावी.!
या सुरभि महोत्सवप्रसंगी सेलू शहरातील सर्व नागरिकांनी , शालेय पालकांनी वरील कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तथा सुरभि महोत्सवाचे आयोजक डॉ. संजय रोडगे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!