आपला जिल्हा

मानवत येथे राज्य सबज्युनियर व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेस प्रारंभ

नागपूर, लातूर , पुणे, नाशिक विभागांची विजयी दौडघोड

परभणी ( प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने व परभणी जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या सहकार्याने मानवत स्पोर्ट्स अकॅडमी मानवत जिल्हा परभणी आयोजित 45 वी सब ज्युनियर राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी व्हॉलीबॉल स्पर्धा 2023 स्पर्धेचे उद्घाटक शामभाऊ चव्हाण (काँग्रेस शहराध्यक्ष मानवत), कार्यक्रमाचे अध्यक्ष .काजी अर्शद (विभागीय सचिव छत्रपती संभाजीनगर), हॉलीबॉल चे राष्ट्रीय खेळाडू तसेच मार्गदर्शक गोपाळभाऊ मंत्री ,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बाबू आचरेकर (स्पर्धा पंचप्रमुख) , दत्ताभाऊ सोमवंशी, (स्पर्धा निरीक्षक) , राजेभाऊ कामखेडे (सचिव परभणी जिल्हा हॉलीबॉल असोसिएशन) , सदरील स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून आठ विभागातून मुले व मुली असे 16 संघाचा सहभाग नोंदविला आहे.

उद्घाटनपर सामने मुलीमध्ये मुंबई विरुद्ध नागपूर मध्ये नागपूर २:० सेट वने विजयी तर मुलांमध्ये नागपूर विरुद्ध अमरावती मध्ये नागपूर २:१ सेट नेट विजयी, नाशिक वि. छ.संभाजीनगर मध्ये नाशिक २:० भेटीने विजयी, लातूर वि. छ.संभाजीनगर मध्ये लातूर २:०:भेटीने विजयी, पुणे वि. मुंबई मध्ये पुणे २:१ भेटीने विजयी ठरले . तसेच प्रास्ताविका मानवत स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष किशन भिसे यांनी केले तर सूत्रसंचालन नांदगावकर सर यांनी केले.
राज्य व्हॉलीबॉल क्रीडा प्रकाश झोतात खेळवला जात आहेत. प्रेक्षकांसाठी प्रेक्षा गॅलरी करण्यात आली आहे.
स्पर्धेस टेनिस व्हॉलीबॉल राज्य सचिव गणेश माळवे, राष्ट्रीय योग प्रशिक्षक डी.डी.सोन्नेकर, किशोर कटारे यांनी भेट दिली. स्पर्धा यशस्वीतेसाठी मानवत स्पोर्ट्स अकॅडमीच्या सचिव ज्ञानेश्वर ठोंबरे,रेंगे सर्व खेळाडूंनी व सदस्य यांनी परिश्रम घेतले

Related Articles

Back to top button
Don`t copy text!