देश विदेश

ओबीसी चळवळीचा फलक झळकला थेट अमेरिकेत!

सोशल व्हायरल

मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर ओबीसी आरक्षण बचावाची चळवळदेखील सुरू झाली असून, राज्यात सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याच विषयाने वातावरण ढवळून निघाले आहे. कुणबी प्रमाणपत्र असलेल्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे हे करीत आहेत, तर ओबीसीतून इतर समाजाला आरक्षण देता येणार नसल्याची भूमिका छगन भुजबळ हे मांडत आहेत. याच कारणांवरून जरांगे- भुजबळ, असा सामना रंगला असून, उभयताकडून दररोज आरोप- प्रत्यारोप आणि जाहीर भाषणांमधून शेरेबाजी केली जात आहे. हा प्रश्न आता केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर थेट अमेरिकेत पोहोचला आहे.

अमेरिकेत ओबीसी आरक्षणाच्या छगन भुजबळ समर्थनार्थ फलक झळकल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ‘ओबीसींची एकच चळवळ, छगन भुजबळ’ असा फलक अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअर चौकात झळकला. तेथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी ओबीसी आरक्षणाला पाठिंबा दर्शविणारे फलक झळकाविले आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!