आपला जिल्हा

डिसेंबर अखेर सेलूत संगीत संमेलन

सेलू दि.७ (प्रतिनिधी) येथील दिवंगत गायक संगीतरत्न कै. हरिभाऊ चारठाणकर स्मृतीत प्रतिवर्षी घेतला जाणारा संगीत महोत्सव ३० व३१ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली.

देवगिरी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने हा महोत्सव घेतला जातो. महोत्सवाचे हे ५वे वर्ष आहे. दोन दिवस होणा-या महोत्सवात चार सत्र होणार असून दोन सत्र स्थानिक कलावंतांसाठी तर उर्वरीत दोन सत्रात दिग्गज कलावंतांच्या मैफली होतील.

दि. ६ डिसेंबर रोजी सेलू नुतन शिक्षणसंस्थेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीस संस्थेचे सचिव माजी प्राचार्य डॉ.वि.खं. कोठेकर, गोविंदभाऊ जोशी, प्रा. संतोष कुलकर्णी, यशवंत चारठाणकर, उद्योजक महेश खारकर, डॉ.राजेंद्र मुळावेकर, रवी कुळकर्णी, डॉ.विलास मोरे, रवी मुळावेकर, गंगाधर कान्हेकर, मोहन खापरखुटीकर, श्रीकांत उमरीकर, मल्हारीकांत देशमुख उपस्थित होते.

मराठवाडाभर उपक्रम

शास्त्रीय संगीताचा प्रचार, प्रसार करणा-या देवगिरी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने मराठवाड्यात विविध संगीत उपक्रमांत पुढाकार घेतला जातो. ८ते १०डिसे. दरम्यान स़ंभाजीनगर येथे देवगिरी सांस्कृतिक महोत्सव तर २५ व २६ रोजी अंबड येथे गायनाचार्य कै. गोविंदराव जळगावकर स्मृतीत दत्तजयंती संगीत महोत्सव होणार आहे. या महोत्सवाचे हे ९९वे वर्ष आहे. जानेवारी महिन्यात परभणी येथे उस्ताद डॉ.गुलाम रसूल यांच्या स्मृतीत दोन दिवसीय संगीत समारोह होणार आहे. १९-२० जानेवारी २०२४ मध्ये फुलंब्री येथे पद्मविभुषण मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर संगीत महोत्सव संपन्न होणार आहे. नांदेड येथे गानमहर्षी आण्णासाहेब गुंजकर यांच्या स्मृतीत संगीत महोत्सव होणार आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!