आपला जिल्हा

सगेसोयरे अध्यदेश लागू करू नये यासाठी परभणीत ओबीसीचे गोंधळ आंदोलन

⬛ शासनाला गोंधळ घालून जागे करण्याचा प्रयत्न

परभणी ( प्रतिनिधी ) सगेसोयरे अध्यदेश लागू करू नये तसेच इतर मागण्यासाठी परभणीत गोंधळ आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी परभणी जिल्ह्यातील ओबीसी समाज आंदोलनात सहभागी झाला.

ओबीसी समाजाच्या वतीने शनिवार १३ जुलै रोजी जिल्हाधिकारी मैदान उपोषण स्थळी ओबीसी आंदोलन करून छत्रपती शिवाजी महाराज चौक,महात्मा फुलै चौक येथे गोंधळ आंदोलन करण्यात आले.
जाहीर जागरण गोंधळ आंदोलनात १) ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. २) शिंदे समिती रद्द केली पाहिजे. ३) सगेसोयरे अध्यादेश लागु करण्यात येऊ नये.
४) मागील दाराने वाटलेले बोगस (अनाधिकृत) कुणबी प्रमाणपत्र रद्द झाली पाहिजे.५) मागील एका वर्षात कुणबी प्रमाणपत्र वर झालेले नोकरभरती रद्द करण्यात यावी.६) परभणी पोलीस चालक भरतीस पात्र असणाऱ्या उमेदवारांचे कुणबी दाखले तथा प्रमाणपत्र (व्हॅलिडीटि) पडताळणी करण्यात यावी. ७) ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह तात्काळ बांधण्यात यावे. ८) महाजोतीस तात्काळ बार्टी सारथीच्या धरतीवरती निधी देण्यात यावा. ९) PHD धारक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांका पासून फेलोशिप लागू करण्यात यावी 10) OBC आंदोलकांवरील मागील दोन वर्षात झालेले आंदोलनातील गुन्हे रद्द करण्यात यावे.
या विविध मागण्या संदर्भात शासनाला गोंधळ घालून जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!