आपला जिल्हा
भुजबळ, मुंडे, जानकरांसह ओबीसी नेते एकत्र
अंबडला १७ रोजी ओबीसी, भटके विमुक्त आरक्षणासाठी शंभर एक्कर वर भव्य सभा

परभणी ( प्रतिनिधी ) मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आधी दंड थोपटल्यानंतर आता प्रमुख ओबीसी नेत्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवत एकत्र येण्याची भूमिका घेतली आहे. जालन्यातील अंबड येथे १७ नोव्हेंबरला ओबीसी, भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा बोलावण्यात आली असून भुजबळांसह पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जयदत्त क्षीरसागर, प्रकाश शेंडगे, आमदार महादेव जानकर, गोपीचंद पडळकर यांच्यासह मुस्लिम ओबीसी संघटनेचे शब्बीर अन्सारी यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.




