आपला जिल्हा

सेलूत श्रीरामकथा कार्यालयाचे उद्घाटन

सेलू  ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्यालयाच्या मैदानावर (हनुमानगढ) आयोजित राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून दिनांक १५ ते २३ आक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या श्रीरामकथा कार्यालयाचे उद्घाटन, दिनांक ३ आक्टोबररोजी आयोजक जयप्रकाश बिहाणी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ सत्यनारायण लोया, उपाध्यक्ष डी.के. देशपांडे, सचिव डॉ.विनायकराव कोठेकर, गोविंद जोशी, डॉ राम रोडगे, मदलाल करवा, दत्तराव पावडे, नंदकिशोर बाहेती, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, विजयकुमार बिहाणी, अतुल दातार,व्यंकटेश काबरा,अविनाश बिहाणी, आदींची उपस्थिती होती.

 

रामकथा कार्यालय उदघाटन व्हिडीओ पहा 

नऊ दिवस चालणाऱ्या श्रीरामकथा सोहळ्यासाठी सात ते आठ हजार आसनक्षमता असलेला वॉटरप्रुफ अत्यंत भव्य असा कथा मंडप व स्वामीजींना कथा निरूपणासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात येत आहे. या कथा मंडप उभारणीच्या कामाची आयोजक व उपस्थित मान्यवरांनी पाहाणी केली. सेलू शहरात ऐवढ्या मोठ्या भव्य स्वरूपात पहिल्यांदाच श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या कार्यरत आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!