आपला जिल्हा

पाथरी विधानसभा मतदारसंघातून महिला प्रतिनिधी म्हणून सोनपेठच्या कीर्ती मुंदडा यांची भाजप तर्फे जवळपास उमेदवारी निश्चित.

मानवत /प्रतिनिधी ( के. डी. वर्मा ) 
विधानसभेच्या पाथरी मतदार संघातून
सोनपेठ येथील श्रीमती कीर्ती ताई मुंदडा यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असून यांनी आपला प्रचाराचा नारळ फोडुन प्रचारास सुरुवात केली आहे.
श्रीमती कीर्ती मुंदडा यांनी पात्री मतदारसंघातून महिला प्रतिनिधी मधून आपले उमेदवारी निश्चित करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे आचार संहिता लागण्या अगोदर त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली भेट घेतली असता त्यांनी मुंबई येथील देवेंद्र फडवणीस यांच्या निवासस्थानी जाऊन पाथरी विधानसभा मतदार संघातून महिला प्रतिनिधी म्हणून उमेदवारी घोषित करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे पाथरी विधानसभा विस्तारक
रेणुकादास देशमुख हे उपस्थित होते.
श्रीमती कीर्ती मुंदडा यांनी सोनपेठ येथील त्यांच्या निवासस्थानी सोनपेठ तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची, याचबरोबर सोनपेठ शहर व तालुक्यातील बुथ प्रमुख. याबरोबर जिल्ह्यातील व तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठक बोलावून त्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन आपल्याला उमेदवारी निश्चित झाल्याचे त्यांनी सांगितले यावेळी बोलावलेल्या बैठकीमध्ये दत्तराव अण्णा भाडोळे, पाटील विधानसभा विस्तारक रेणुकादास देशमुख, परभणी ग्रामीणचे आकाश लोहट, जिल्हा भाजप उपाध्यक्ष महादेव गिरे पाटील, भाजप सोनपेठ तालुका युवा अध्यक्ष परमेश्वर गव्हाणे पाटील, जिल्हा युवा उपाध्यक्ष गणेशराव हांडे, परभणी जिल्हा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव रासवे, जिल्हा नियोजक ओंकार यादव पाटील, भारतीय जनता पार्टी सोनपेठ तालुका अध्यक्ष निर्मलाताई चव्हाण,ल बुथ प्रमुख, तसेच सोनपेठ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे आजी व माजी सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीमती कीर्ती मुंदडा यांचे पती स्वर्गीय बालाप्रसादजी मुंदडा हे भाजपचे जिल्हा माजी उपाध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टी व्यापारी प्रकोष्ठ मराठवाडा विभागाचे ते अध्यक्ष होते. यात बरोबर सोनपेठ नगरपालिकेचे ते काही दिवस काळजीवाहू नगराध्यक्ष होते. सोनपेठ तालुक्याचा विकास व्हावा या उद्देशाने स्वर्गीय बालप्रसादजी मुंदडा यांनी तालुक्यातून एक राष्ट्रीय महामार्ग जावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे शिष्टमंडळाद्वारे मागणी केली. याचबरोबर सोनपेठ तालुक्याततुन रेल्वे मार्ग जावा यासाठी मानवत रोड ते परळी वाया सोनपेठ या नवीन रेल्वे मार्गासाठी ही स्वर्गीय बालाप्रसादजी मुंदडा यांनी पुढाकार घेऊन तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. 2018 च्या मध्ये या रेल्वे मार्गाचे सर्वे झाले परंतु त्यांच्या अकाली निधनामुळे हा मार्ग रेंगाळला आहे.
यावेळी श्रीमती कीर्ती मुंदडा यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून आपले विचार व्यक्त करताना सांगितले सोनपेठ तालुक्याच्या विकासासाठी माझे पती स्वर्गीय बालप्रसादजी मुंदडा यांनी तन-मन-धनाने पुढाकार घेऊन विकासासाठी कार्यरत राहिले. त्यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात प्रवेश केला आहे. स्वर्गीय बालाप्रसादजी मुंदडा यांनी राजकारणाबरोबर समाजकारणात ही आपला कार्याचा ठसा उठविला. सोनपेठ तालुक्याबरोबर पाथरी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी तसेच सोनपेठ मानवत, पाथरी, या शहरातील विकासाबाबत, शिंदे

गटाचे शिवसेनेचे कार्यकर्ते. पदाधिकारी नेते व अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्या बरोबर व कार्यकर्त्या बरोबर व भाजपाचे सर्व नेते व महिला आघाडीच्या सर्व बरोबर त्यांच्या सोबत राहून

मी पुढाकार घेऊन कार्यरत राहणार. असे आपले मनोगत व्यक्त करताना श्रीमती कीर्ती मुंदडा यांनी आपले विचार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!