आपला जिल्हा

शारदा विद्यालयात सायकल वाटप व वृक्षारोपण

विद्यार्थ्यांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षण घ्यावे-आमदार सौ. मेघना साकोरे- बोर्डीकर

सेलू ( प्रतिनिधी )शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे ,शासनाकडून शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी मानव विकास योजने अंतर्गत विविध योजना राबविल्या जातात त्याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणातून राष्ट्रसेवा करावी असे आवाहन आमदार सौ मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी केले.

येथील श्री संत गोविंद बाबा शिक्षण प्रसारक मंडळ सेलू संचलित शारदा विद्यालयाच्या नवीन इमारत परिसरात वृक्षारोपण व मानव विकास योजने अंतर्गत विद्यार्थीनींना सायकल वाटप करताना प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या, या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष श्री मुंजाभाऊ भिसे, तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्था सचिव चंद्रप्रकाशजी सांगताणी, संचालक डॉ.ए.एम.डख, जयप्रकाशजी बिहाणी, सहसचिव सुनीलभाऊ डख, प्रल्हादराव कान्हेकर,दिपकराव खराबे,जीवन अप्पा तरवडगे,प्रफुल्लकुमार बिनायके,नंदकिशोर बहिवाल यांची उपस्थिती होती.
तसेच माजी उपसभापती सुंदरराव गाडेकर, शहराध्यक्ष कपील फुलारी, गणेश काटकर, मयुर वाघ, बाळासाहेब काजळे ,मुख्याध्यापक प्रदिप कौसडीकर , सय्यद जलाल भाई, सुनील गायकवाड,माता पालक आदींची उपस्थिती होती.
या वेळी आमदार सौ मेघना साकोरे- बोर्डीकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ५० लाभार्थी विद्यार्थीनींना मानव विकास योजने अंतर्गत सायकल वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासकीय अधिकारी चंद्रशेखर नावाडे, सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर मुख्याध्यापक डी.डी.शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक बी.आर. साखरे,भरत रोडगे, संतोष चारठाणकर, रोहिदास चव्हाण, अभिमान पाईकराव, विजय हिरे, संदीप जुमडे, सौ.उषा कामठे, सौ. सीमा उंडे,बालासाहेब टरपले, नानासाहेब भदरगे, विजय अंभुरे, श्रीमती भारती मुळे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!