आपला जिल्हा

३२ टिनशेड प्रकरणी सभापती व संचलाक मंडळाकडून नियमांचे उल्लंघन नाही. बहुचर्चीत पाथरी बाजार समीतीचे ३२ टिनशेड प्रकरण.

जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी सचिवावर ठपका ठेवत कारवाई सह ३२ टिनशेड पाडण्याचे दिले निर्देश.

सेलू (प्रतिनिधी ) पाथरी बाजार समीतीच्या ३२ टिनशेड बांधकाम गैरव्यवहार तक्रार आरोपातील अनिल नखाते व ईतर दोन संचालक पुन्हा निवडणूक जिंकुन संचालक पदी विजयी झाले.आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली अनिल नखाते यांची दुसऱ्यांदा सभापतीपदी

निवड झाली त्यामुळे या प्रकरणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.याप्रकरणी परभणी जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी ६ ऑक्टोबरला दिलेल्या कारवाईचे निर्देश आदेशात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सभापती व संचलाक मंडळाकडून कलम १२ (१) चे उल्लंघन झाल्याचे दिसून येत नाही.मात्र सचिव यांनी कलम ३२ (इ) नुसार कारवाई करणे अपेक्षित होते परंतु तसे न करता त्यांनी कायद्याचे व उपविधीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत सचिव यांना दोषी ठरवत त्यांचेविरूध्द १५ दिवसात कारवाई तर ३० दिवसात ३२ टिनशेड बांधकाम पाडण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उध्दवराव नाईक यांनी पाथरी बाजार समीतीचे ३२ टिनशेड बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी सभापती व संचालक मंडळ यांचेवरूध्द जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे २७ आँक्टोंबर २०२२ रोजी तक्रार केली होती.या अनुषंगाने जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग १ व्ही. पी. भोसले यांनी मुद्देनिहाय चौकशी करुन अहवाल सादर केला.त्यानंतर या चौकशी अहवालाची वस्तुस्थिती पडताळणीसाठी सहाय्याक निबंधक एम.यू.यादव यांची समीती गठीत केली.नंतर विविध पदभारमुळे कालमर्यादित पूर्ण होणे शक्य होणार नसल्यामुळे हि व्यापक चौकशीचे कामकाज सहायक निबंधक सहकारी संस्था गंगाखेड यांचेकडे दिले.या त्रिसदस्यी समितीने चौकशी पुर्ण करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल उपजिल्हा निबंधक कार्यालयास सादर केला.

▪️त्यानंतर पुढे जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी आदेशाद्वारे असे निर्देश दिले.
या अहवालानुसार परभणी जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी ६ ऑक्टोबरला कारवाईचे निर्देश आदेश दिले आहेत.यामध्ये गैरव्यवहार प्रकारणी तक्रार आरोपातील सभापती अनिल नखाते व. संचलाक मंडळाकडून
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कलम १२ (१) चे उल्लंघन झाल्याचे दिसून येत नाही असा निष्कर्ष नोंदवला.मात्र सचिव बि.जे.लिपणे यांनी कलम ३२ (इ) नुसार कारवाई करणे अपेक्षित होते परंतु तसे न करता त्यांनी कायद्याचे व उपविधीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत सचिव लिपने यांना दोषी ठरवत १५ दिवसात कृषी पणन कायदा तरतुदीनुसार १५ दिवसात कारवाई करून अनुपालन अहवाल सादर करावा.तसेच विवादित ३२ प्लॉटवर अनधिकृत केलेले बेकायदेशीर टिन शेडचे बांधकाम ३० दिवसात पाडण्यात यावे व कार्यपूर्तीचा अहवाल सहायक निबंधक सेलू यांच्यामार्फत सादर करण्यात यावा असे निर्देश दिले आहेत.

▪️बाजार समीती निवडणूक दरम्यान आणि निवडणूकीनंतर या तक्रारीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.विशेष तक्रारी अनुषांगीक तात्कालिन सभापती अनिल नखाते, संचालक प्रभाकर शिंदे व सय्यद गालेब हे पुन्हा बाजार समीती निवडणूक जिंकुन संचालक झाले त्यानंतर सभापतीपदी दुसऱ्यांदा अनिल नखाते यांची निवड झाली.त्यानंतर पुन्हा हे तक्रार प्रकरण सातत्याने चर्चीला येत होते.पण या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी सभापती अनिल नखाते यांचे सह संचालक यांनी याप्रकरणी नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे निर्देश दिल्याने हि बाब आ.दुर्राणी यांचे नेतृत्वाखाली काम करणाऱ्या संचालक मंडळासाठी महत्वपूर्ण ठरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!