आपला जिल्हा
पाथरी रोड ते फुलेनगर या ठिकाणी मोठ मोठे दगड टाकून ठेवल्याने मतदारांना मतदान करण्यासाठी अडथळा
⬛सेलू परिसरातील जवळपास साडेतीन हजार मतदाराना होणार त्रास

सेलू ( प्रतिनिधी ) परभणी लोकसभा मतदारसंघातील जिंतूर विधानसभा मतदान क्षेत्रातील सेलू भागातील मतदान केंद्र क्रमांक 56 व 57 या ठिकाणी सदरील रोडचे काम होत असल्याने पाथरी रोड ते फुलेनगर या ठिकाणी रोडच्या कामासाठी मोठ मोठे दगड टाकून ठेवल्याने मतदारांना मतदान करण्यासाठी अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे सदरील परिसरातील नागरिकांनी 26 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान कसे करावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.




