आपला जिल्हा

डॉ संजय रोडगे मित्र मंडळाच्या वतीने रेणुका माता दर्शनाकरिता वाहनाची मोफत व्यवस्था

सेलु  ( प्रतिनिधी ) श्रीराम प्रतिष्ठान व डॉ. संजय दादा रोडगे मित्र मंडळ यांच्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त मंठा येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी मोफत गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद रवळगाव सर्कल मधील विविध गावातील महिलांना रेणुका माता देवी दर्शन मंठा करिता नेण्यात आज आले

सेलू येथे वापस आल्यानंतर डॉ. सविता रोडगे यांनी महिलांशी संवाद साधला असता त्यांनी आपुलकीने दर्शन व प्रवासासंबधी विचारपुस केली. यावेळी सर्व महिलांना रेणुका मातेचा फोटो सह फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
याप्रसंगी संस्थेच्या सचिव डॉ. सविता रोडगे, शिंदे टाकळी येथील सरपंच सौ. आश्विनी कैलास पवार तसेच उपसरपंच सौ. नंदा रामेश्वर पवार,श्री . कैलास पवर व श्री. रामेश्वर पवार सह डॉ . संजयदादा रोडगे मित्र मंडळाचे श्री. प्रकाश गजमल, श्री. गणेश रोडगे व श्री. संजय गटकळ सर्व शिंदे टाकळी येथील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!